सह्याद्रीचे रत्न-Jewel of Sahyadri
Ratangad Fort हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रतनवाडी गावात स्तीत आहे. रतनगड हा अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्याच्या सीमेवर आहे. हा किल्ला सुमारे 400 वर्षे जुना आहे. रतनगडाला सह्याद्रीचे रत्नही म्हणतात
रतनवाडी -Ratanwadi
रतनवाडी हे गाव अकोले तालुक्यापासून 49 किमी आहे तसेच अहमदनगर पासून १६२ किमी आहे तसेच ठाणे पासून पण १६२ किमी आहे.
रतनवाडी हे गाव भंडारदरा बॅकवॉटर जवळ स्तीत आहे. आपण रतनवाडीला जाताना आपण एक अविस्मरणीय अनुभव आपल्याला येतो.सुंदर असे वातावरण उंच असे डोंगर अनेक धबधबे आणि त्यामधून पडणारे पांडरेशुब्र असे पाणी आपले मन मोहून घेते. रतन गड चढायला सुरुवात रतनवाडी पासून करावी लागते.
Table of Contents
अमृतेश्वर मंदिर-Amruteshwer Temple
रतनवाडी गावात प्रवेश केल्यावर प्रथम सुंदर कोरीव केलेले असे महादेवाचे मंदिर आहे . अमृतेश्वर मंदिर हे १२ व्या शतकात बांधलेले आहे . हे मंदिर अतिशय नयनरम्य ठिकाणी आहे,एका बाजूला रतनगड तर एका बाजूला भंडारदरा बॅक वॉटर आणि त्यात निरव शांतता. रतनवाडी येथील मुख्य आकर्षण म्हणजे हेमाडपंत कालखंडातील – कोरीव कामांसाठी प्रसिद्ध असलेले अमृतेश्वर मंदिर.


मंदिर हे पश्चिमेकडे तोंड करून आहे त्यातील शिवलिंग हे पाण्यात आहे. मंदिराच्या मागील दरवाजाकडे म्हणजेच पूर्वकडे तोंड करून पश्चिमेकडील दरवाजावर नंदी स्थापन केलेली आहे. हे सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिरा सारखेच असून स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने भूमिज प्रकारातील मंदिरामध्ये याचा समावेश केला जाऊ शकतो.
मंदिराजवळ स्थानिक स्तरावर पुष्करणी नावाने ओळखली जाणारी बारव असून त्यार्थी स्थापत्ययोजना चौकोनी आहे. यामध्ये उतरण्यासाठी तीन दिशांनी पायऱ्यांची योजना करण्यात आलेली आहे. आजूबाजूला अनेक उपमंदिरे आहेत.
रतनगड मध्ये प्रवरा/अमृतवाहिनी नदीचा उगम आहे. या नदीचे पाणी या शिवलिंगाला स्पर्श करून जाते. नदीवर भंडारदरा धरण बांधले आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने हे राष्ट्रीय महत्त्व असलेले स्मारक घोषित केले आहे.
हे पण बघा
Golconda fort Information in Marathi : गोलकोंडा किल्ला माहिती मराठीमध्ये
Forts In Ahmednagar ”अहमदनगर मधील किल्ले”
रतनगड किल्याचा इतिहास-History Of Ratangad Fort
छत्रपती शिवाजी महाराज यांनी इ स. १६६० मध्ये उत्तर मोहीम मध्ये मोरोपंत आणि स्थानिक महादेव कोळी यांच्या मदतीने हा किल्ला स्वराजात घेतला आणि किल्ल्यावर महादेव कोळी यांची नेमणूक केली.
महाराजांनी सुरतेच्या स्वारीवरून येताना इ.स १६६४ साली आश्रय घेतला होता हा किल्ला भौगोलीक महत्वाचा होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा रतनगड हा आवडता किल्ला होता.
रत्नाबाई तांदळ यांच्या नावावरून किल्ल्याला हे नाव देण्यात आले आहे, ज्यांचे गडावरील गुहेच्या आत एक छोटेसे मंदिर आहे.
रत्नाबाई, कळसूबाई आणि कात्राबाई या तीन बहिणी होत्या त्यापैकि एक होती.
रतनगड हा १८१८ साली ,राजूर ३६ खेडी,अलंग २२ सोकुर्ली ६०,वाडी परगण्याची २२ आणि जुरुश्रोशी परगण्याची ६० खेडी अश्या या पाच विभागाचे मुख्यालय होते.
अमृतवाहिनी / प्रवरा नदीचा उगम
पुराणामध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा देव या राक्षस यांच्या मध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी नेवासा येथे होणार होती,येथे देवांनी अमृतप्राशन केले त्याच पंगती मध्ये राहू नावाचा राक्षस याने अमृत प्राशन केले हे भगवान विष्णूला समजतच त्यांनी मोहिनी रूप धरण करून त्या राक्षसाचा शीर उडवले त्याचे धड राहुरी या ठिकणी पडले आणि त्याचे शीर हे रतनगड या ठिकाणी पडले त्याच्या कंठातून अमृताची धार गडावरून वाहू लागली त्यापासून नदीची रूपांतर झाले त्या मुळे नदीला अमृत वाहिनी किंवा प्रवरा नदी असे म्हणतात.
रतनगडावर पाहण्यासारखी ठिकाणे-Places to see on Ratangad fort
- गणेश दरवाजा
- रत्नाआई चे मंदिर
- गुहा प्रमुख दरवाजा
- कडेलोट पॉईंट
- प्रवरेच्या उगमस्थान
- अंधार कोटी
- १२ तळे
- कल्याण दरवाजा
- राणीचा हुडा
- नेढं (गडाला एका ठिकाणी हवेच्या दाबाने पडलेले मोठे भगदाड )
- गडाचे अवशेष
- बुरुज
नेधे’ किंवा ‘आय ऑफ द नीडल-
रतनगडावर एक नैसर्गिक शिलाशिखर आहे ज्यामध्ये वरच्या बाजूला पोकळी आहे ज्याला ‘नेधे’ किंवा ‘आय ऑफ द नीडल’ म्हणतात. रतनगडला गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक असे चार दरवाजे आहेत. मुख्य दरवाज्यावर गणेश आणि हनुमानाची शिल्पे दिसतात. त्याच्या वरच्या बाजूला अनेक विहिरी देखील आहेत.. गडाच्या माथ्यावरून शेजारील अलंग, कुलंग, मदन गड, हरिश्चंद्रगड, पट्टा असे किल्ले सहज दिसतात. संपूर्ण भंडारदरा धरणाचे दृश्य निखळ आनंद देते. गडावर अनेक दगडी पाण्याची टाकी आहेत. त्यापैकी काही वर्षभर पिण्यायोग्य पाणी साठवतात..किल्ल्याच्या पूर्वेला दोन गुहा आहेत, ज्याचा वापर रात्रीच्या मुक्कामासाठी करता येतो.

या किल्ल्याला वर्षाच्या कोणत्याही भागात भेट दिली जाऊ शकते, परंतु ऑक्टोबर-फेब्रुवारीमध्ये जनावरांचा हंगाम असतो जेव्हा तापमान थंड असते आणि झाडे सुकलेली नसतात.
पुष्प महोस्तव /Flower Festival on Ratangad fort
सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण डोंगर सोनकीच्या फुलांनी व्यापलेला असतो.भौगोलिकदृष्ट्या रतनगड अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा तलावाच्या काठी आहे. सह्याद्रीतील सरोवर आणि उंच पर्वतांच्या नजारांसोबत काळाच्या ओघात हरवलेला दिसतो. या किल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगांचे विलोभनीय दर्शन घडते. कात्राबाईपासून अगदी सांधण खोऱ्यापर्यंत.
फ्लॉवरिंग सप्टेंबरमधील सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक, रतनगड, पिवळ्या सोनकीच्या फुलांनी सावली केलेला दिसतो. अनेक ट्रेकर्स पावसाळ्यानंतर किल्ल्याला भेट देत आहेत कारण किल्ला पिवळ्या फुलांच्या गालिच्याने व्यापलेला आहे. सात वर्षांतून एकदा, कारवीची फुले उमलतात, कारवीमध्ये जांभळ्या रंगाच्या गालिच्यात किल्ल्याचा समावेश होतो. तुम्हाला तुमचे अन्न घेऊन जाण्यासाठी आणि तुमचे अन्न शिजवण्यासाठी आवश्यक असलेल्या गुहांमध्ये तुम्ही तळही ठेवू शकता.
इतर माहिती –
प्रदेश : भंडारदरा
पायथ्याचे गाव : रतनवाडी/साम्रद
खूण: भंडारदरा धरण
सर्वोच्च उंची : 4260 फूट (1297 मी)
ट्रेकचा कालावधी : ३.५ तास चढणे, ३ तास उतरणे
सभोवतालची शिखरे: अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा शिखर, विश्रामगड, कात्राबाई, सांधण व्हॅली
आदर्श हंगाम : जून ते फेब्रुवारी (पावसाळा महिने हवामानानुसार चांगले असतात आणि हिवाळ्याचे महिने स्पष्ट दृश्यांसाठी). जेव्हा सोनकीची फुले मोठ्या संख्येने बहरतात तेव्हा भेट देण्यासाठी सप्टेंबर हा सर्वोत्तम महिना असतो.
कसे पोहोचायचे-How to Rich there
गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक हा साम्रद या गावातून तर दुसरा रतनवाडी गावातून सुरू होतो.रतनवाडीगावापासून पासूनचा ट्रेक मार्ग सर्वात सोपा आहे, तो प्रवरा नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरील घनदाट जंगलामधून जातो,जोपर्यंत तो एका कातळावर पोहोचतो. वनविभागाने बांधलेल्या लोखंडी शिडीमुळे अंतिम चढाई सोपी केली जाते.
वीकेंडला स्थानिक गावकरी ट्रेकर्सना चहा-नाश्ता देण्यासाठी वाटेत छोट्या झोपड्या उभ्या करतात. काही गावकरी गडाच्या गुहेवर जेवण आणि नाश्ता देतात. साम्रद गावातून जाणारा ट्रेक मार्ग खूपच अवघड आहे, तो अरुंद ओलांडून जातो आणि शेवटी त्र्यंबक दरवाजावर पोहोचतो. गडाच्या कड्याभोवती फिरणारी वाट धरून संपूर्ण किल्ला दिसतो. लोकांचा एक छोटासा गट गडावरील गुहेत रात्रभर मुक्काम करू शकतो.
FAQ-
रतनगड ला जाण्यासाठी सर्वात उत्तम काळ कोणता ?
सप्टेंबर ते जानेवारी हा सर्वात उत्तम काळ आहे.
रतनगड कशासाठी प्रसिद्ध आहे?
महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी रतनगड हे अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. हा किल्ला 4250 फूट उंचीवर आहे. रतनगड किल्ला हा ४०० वर्ष जुना किल्ला आहे, जो मराठा योद्धा शिवाजी महाराजांनी वापरला होता. किल्ल्याला गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक असे चार प्रकारचे दरवाजे आहेत.
रतनगडावर कोणती फुले आढळतात?
रतनगडावर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण डोंगर सोनकीच्या फुलांनी व्यापलेला असतो.
रतनगड किल्ल्याचा इतिहास काय आहे?
हा किल्ला 400 वर्ष जुना आहे. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांनी रतनगड ताब्यात घेतला. रत्नाबाई तांदळ यांच्या नावावरून किल्ल्याला हे नाव देण्यात आले आहे, ज्यांचे गडावरील गुहेच्या आत एक छोटेसे मंदिर आहे.
फ्लॉवर महोत्सव कधी असतो?
सात वर्षांतून एकदा, कारवीची फुले उमलतात. २०२२ साली फ्लॉवर महोत्सव होता,तो आता पुढच्या सात वर्ष्यानी म्हणजे २०२९ साली होईल.
रतनगड किल्ला कुठे आहे?
रतनगड किल्ला हा अहमदनगर जिल्यातील अकोले तालुक्यापासून 49 किमी आहे तसेच अहमदनगर पासून १६२ किमी आहे तसेच ठाणे पासून पण १६२ किमी आहे.
मुंबईहून रतनगडावर कसे जायचे?
रतनगड वर जाण्यासाठी आधी रतनवाडीला जावे लागेल त्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन कसारा येथे उतरावे आणि महामंडळ बस किंवा स्थानिक गाडी भाड्याने घाऊ शकता .