“मैत्री म्हणजे विश्वास, आनंद आणि एकमेकांच्या भावनांची जपणूक. पण कधी कधी गैरसमज, संवादाचा अभाव आणि अंतर यामुळे सर्वकाही बदलतं. या पत्राद्वारे मी माझ्या बेस्ट फ्रेंडला निरोप देत आहे. माझ्या मनातील भावना व्यक्त करत, माफी मागत आणि या नात्याला एका योग्य शेवटाला नेण्याचा प्रयत्न करत आहे.

Best friend Breakup Letter:हरवलेल्या मैत्रीची कहाणी
प्रिय (मैत्रीनेचे नाव),
सर्वप्रथम, हा संदेश लिहिण्याचं कारण मला स्पष्ट करायचं आहे. आपण एकमेकांसोबत कधी इतकं छान नातं बांधलं होतं की ते एका वेगळ्या विश्वासावर उभं होतं. मात्र, हल्ली काही गोष्टी माझ्या मनाला खूप चुटपुट लावून गेल्या आहेत.
हल्ली तू माझे कॉल उचलत नाहीस, किंवा अगदी उत्तरही देत नाहीस. “बेस्टफ्रेंड” म्हणून जेव्हा आपण परस्परांशी नातं जपायचं ठरवलं होतं, तेव्हा फक्त नावापुरतं नव्हतं, तर त्यात प्रेम, विश्वास आणि समर्पण होतं. पण अलीकडे तू माझ्यापासून फार दूर गेल्यासारखं वाटतंय.
माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत: मी काही चुकले का? जर चुकले असेल तर कृपया सांग, मी त्यात सुधारणा करीन. पण तू मला थेट ब्लॉक केलंस, त्याने मला खूप दु:ख झालं. मी इंस्टाग्रामवरून तुला अनफॉलो केलं कारण मी पाहत होतो की, तू काही संदेश करतेस का, किंवा कधी काही संवाद साधतेस का. पण तेही घडलं नाही. खरं बेस्टफ्रेंड असतो तर त्या नात्यात संवाद महत्त्वाचा असतो, पण तुझ्याकडून काहीच प्रतिसाद नाही याचं वाईट वाटतंय.
त्या दिवशी मी तुला कॉल केला होता. तुला काही विचारीन म्हणून. पण तू खूप व्यस्त वाटत होतीस. मी स्वतःहून शनिवारचा कॉल करायला सांगितलं होतं. मी वाट पाहिली, पण तो कॉल कधीच आला नाही.
तसेच, मला समजलं की तू घरला गेलीस, पण याबद्दलही मला काही सांगितलं नाहीस. याआधी प्रत्येक वेळी तुझ्या घरी जाण्यापूर्वी तू मला सांगायचीस, पण आता मात्र मला काहीही कळलं नाही. तुला कॉल केल्यावरही प्रतिसाद मिळाला नाही. मी खूपच गोंधळून गेलो की, मी काय चुकीचं केलं?

तुझ्या आयुष्यात मी त्रासदायक ठरत असेन, तर मी इथून पुढे तुला कधी त्रास देणार नाही. हे शेवटचं पत्र आहे माझं. जर काही चुकलं असेल, तर क्षमस्व. पण मी खरोखर मनापासून तुझं नातं जपायचा प्रयत्न केला होता.
आता मी तुझ्या आयुष्यात काहीही हस्तक्षेप करणार नाही. तू आनंदी राहा, तुझ्या स्वप्नांचा पाठपुरावा कर. मी तुला नेहमीच शुभेच्छा देत राहीन.
आपलं नातं इथेच संपलं, पण आठवणी मात्र कायम राहतील.
तुझा, (तुमचं नाव).
“मैत्रीच्या या प्रवासातील आठवणी नेहमी माझ्या सोबत राहतील. या पत्राद्वारे मी शेवटचा निरोप देत आहे, परंतु मनात कुठेतरी तुझ्या आनंदासाठी प्रार्थना करत राहीन. माफ कर, जर काही चुकलं असेल तर. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा आणि नेहमी आनंदी रहा.”
हे पण बघा: